नाशिक: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पीक विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. त्यांनी बुधवारी नांदगाव तालुक्यातील चांदोरा येथील चारा छावण्यांना भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी हा आरोप केला.
सरकारने दुष्काळासाठी उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी त्या केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत. पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना नव्हे तर कॉर्पोरेट विमा कंपन्यांना जगविण्यासाठी सुरु आहे. सरकारकडे समृद्धी महामार्गावर खर्च करण्यासाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही, असेही त्यांनी सांगितले.


