नाशिक : देशात कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण करण्यावर भर दिला जातोय. यासाठी खबरदारी म्हणून अनेक नागरिक लस घेत आहेत. मात्र अनेक लोकांनी लस घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम झाले असल्याचे सांगितले आहे. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नाशिक शहरातील सिडको भागातील अरविंद जगन्नाथ सोनार या ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चक्क लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचा अजब प्रकार घडला आहे. अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला आहे.
त्यानंतर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ‘यामागे नक्की काय आहे, ते तपासले जाईल. मेडिकल कारण काय आहे, हे तपासू त्यानंतर नक्की कशामुळे हे झाले आहे, ते पाहू.’ असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
दरम्यान, अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला आहे. त्यांच्या मुलाने अशाच प्रकारे कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या अंगाला लोखंडी साहित्य चिकटल्याची बातमी एका वृत्तवाहिनीवर बघितली. हे पाहून त्यांनी सहज आपल्या आई वडिलांनावर देखील तसाच प्रयोग करून पाहायला तर आईला असे काही झाले नाही. मात्र वडिलांच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचे यातून समोर आले. यानंतर त्यांनी खासगी वैद्यकीय व्यवसायिकांशी संपर्क साधला. त्यांनी देखील हा अनोखा प्रकार असल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- लोकसभा आणि विधानसभेतही महाविकास आघाडी एकत्र लढणार; पवारांच मोठं विधान
- बनावट ओळख पत्र बनवून निवडणूक आयोगाची फसवणूक करणारा दहा वर्षांनतर अटकेत
- नेट संपले तरी चालेल, किमान समान कार्यक्रमामुळे तिन्ही पक्षाचे नेते बोललेच पाहिजे; म्हाडाच्या सोडतीवर गमतीदार प्रतिक्रिया
- स्पर्धा परीक्षेतून निवड झाली परंतु नियुक्त्या रखडल्या; मराठा समाजातील तरूणांचे भवितव्य धोक्यात
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता, यंत्रणांना सतर्कतेचे आदेश


