Share

बार्शीत ट्रॅक्टरचा फॅक्टर जोरात, अपक्ष राजेंद्र राऊतांनी केला सोपलांचा पराभव

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: सोलापूर जिल्ह्यातील अटीतटीची लढाई बनलेल्या बार्शी विधनासभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी विजय मिळवला आहे. आजवर सातवेळा आमदार राहिलेले आणि यंदा शिवसेनेतून लढलेले दिलीप सोपल यांचा राऊत यांनी पराभव केला.

बार्शी विधानसभा मतदारसंघात परंपरेप्रमाणे दिलीप सोपल विरुध्द राजेंद्र राऊत सामना रंगला होता. सोपल यांनी अचानक राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. तर युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे राहणार असल्याचं अंदाज आल्याने राऊत यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरुवातीपासून ठेवली . सोपल हे धन्युष्यबाणाच्या तर अपक्ष असणारे राऊत ट्रॅकर चिन्हावर लढले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून निरंजन भूमकर या नवख्या उमेदवाराला मैदानात उतरवण्यात आले होते.

दिलीप सोपल हे आजवर सहावेळा येथून विजयी झालेले होते. २००४ साली शिवसेनेकडून लढणाऱ्या राजेंद्र राऊत यांनी त्यांचा पराभव केला होता. सुरुवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निरंजन भूमकर यांचा फटका सोपल यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मतदानापूर्वी भूमकर यांनी दोन्ही विरोधी उमेदवारांना वैराग भागामध्ये पळायला लावले. यंदा मतदारसंघात ‘लक्ष्मी’दर्शन देखील जोरात झाले आहे. विकासापेक्षा एकमेकांचे उट्टे काढण्यात सर्व उमेदवारांनी धन्यता मानली.

मतमोजणीमध्ये अखेररपर्यंत चुरस सुरु होती. शहराने सोपल यांना कौल दिला. तर ग्रामीण भागामध्ये राजेंद्र राऊत यांना मताधिक्य मिळाले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1187287663268679680?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1187287647300902912?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!