अकोला : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे यांनी लॉकडाऊनमधील भरमसाठ वाढीव वीजबिलांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेत. सरकारमधील वीज मंत्री आधी वीज बिल कमी करु असं म्हटले. मात्र, अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, अशी भूमिका घेतली. सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय.
राज ठाकरे म्हणाले, “सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं कळत नाहीये. मुलांच्या परीक्षांचा विचार नाही करायचा, कशाचाच विचार नाही करायचा. वीज बिल माफ होण्यासाठी वीज कंपन्यांबरोबर चर्चा कराव्या लागतील. पण या चर्चा थांबल्या आहेत. काही तरी लेणदेण झाल्याशिवाय या चर्चा थांबणार नाहीत. सरकार सर्व वीज कंपन्यांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे.”
सरकार आंदोलन केल्यावर आंदोलकांवर गुन्हे दाखल करतंय, वीज बिल माफही करत नाही. लोकांना भरमसाठ वीज बिलं भरण्यास सांगितलं जातंय. हे सगळं कुणासाठी सुरु आहे? असाही सवाल राज ठाकरेंनी विचारला.
राज ठाकरेंच्या याच विधानाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीची गरज असल्याने ते अशाप्रकारे बेफाम वक्तव्य करीत असल्याचा घणाघात जयंत पाटील यांनी केला आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागांतर्गत अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- पियुष गोयल शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार
- ‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा


