Share

राज ठाकरे जेंव्हा वडापाव वर ताव मारत कार्यकर्त्यांशी सवांद साधतात

Published On: 

सिंधदुर्ग: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी देवगड-कणकवली या मार्गावरील आसरा हॉटेल येथे वडापाव वर ताव मारत कार्यकर्त्यांशी सवांद साधला.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सर्व राजकीय पक्ष रिंगणात उतरले आहे. पडद्यामागच्या प्रचाराला सुरवात झाली आहे, यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सक्रीय झाली आहे. पक्षजोडणीसाठी खुद्द राज ठाकरे मैदानात उतरले आहेत.

यापूर्वी देखील पालघर जिल्ह्यातील, वाडा तालुक्यातील वाडा विभाग अध्यक्ष आणि कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव यांच्या आदिवासी पाड्यावरच्या घरी जेवायला गेले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या या कार्यकर्त्याच्या घरी त्याच्याबरोबर जमिनीवर बसून जेवण केले होते. त्यांच्या या कृतीचे सगळ्याच स्थरातून कौतुक होत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!