🕒 1 min read
Radhakrishna Vikhe Patil। मुंबई : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपाचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली पाहायला मिळाली. अशातच आता राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांच्या या वक्तव्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी फोडण्याबाबत केलेलं हे वक्तव्य रोहित पवार यांनी प्रसिद्धीसाठी केल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेनंतर आता भाजपचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव आहे, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं होतं. याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना विचारले असता, यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि, त्यांचे घर फोडायला इथे कुणालाही वेळ नाही. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचं जे काही नुकसान झालं आहे, ते आम्हाला भरून काढायचं आहे. आम्हाला राज्याची घरी पुन्हा बसवायची आहे. त्यामुळे आम्हाला कोणाचे घर फोडायला वेळ नसल्याचं म्हणत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.
काय म्हणाले होते रोहित पवार?
शिवसेनेनंतर आता विरोधकांचा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा डाव आहे. पवार कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण काहीही झालं तरी आमच्यात फूट पडणार नाही. सुप्रिया सुळे केंद्रात तर अजित पवार आणि आम्ही राज्यात आहोत, त्यामुळे संघर्ष होण्याचं कारण नाही, असं विधान रोहित पवार यांनी केलं होतं.
दरम्यान, रोहित पवार यांनी प्रसिध्दीसाठी हे वक्तव्य केल्याचं विखे पाटील म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्याला रोहित पवार यांच्याकडून काय उत्तर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | दिवाळीनिमित्त राज ठाकरेंनी लिहिलं मुंबईकरांना पत्र, म्हणाले…
- Mahindra Electric Car | महिंद्रा लवकरच लाँच करणार आहे 2-डोअर इलेक्ट्रिक कार
- Navneet Rana । नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट! नेमकं काय आहे प्रकरण?
- Kiran Kumar Bakale | मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलणे भोवले ; निलंबित किरण बकालेचा जामीन अर्ज फेटाळला
- Urfi Javed | फुफ्फुसांच्या आकाराचा ड्रेस परिधान केल्यावर उर्फी झाली ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
