टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कारण देशात सध्या इलेक्ट्रिक कारचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे गेल्या वर्षात अनेक कंपन्यांनी आपले इलेक्ट्रिक मॉडेल्स बाजारात लाँच केले आहे. यामध्ये आता भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा Mahindra लवकरच भारतात आपली 2-डोअर इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. महिंद्रा ने या कारचे नाव महिंद्रा ॲटम (Mahindra Atom) असे ठेवले आहे. 2020 ऑटो एक्स्पो मध्ये महिंद्राने पहिल्यांदा ही कार सादर केली होती. महिंद्राची ही नवीन इलेक्ट्रिक कार देशातील पहिली क्वाड्रिसायकल इलेक्ट्रिक कार असणार आहे. चला या कार बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
लुक
महिंद्राच्या या नव्या महिंद्रा ॲटमच्या लुक बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 2 खिडक्यांसोबत सिंगल वायपर, ब्लॅक-आउट पिलर, एलईडी हेडलॅम्प, फ्लॅट विंडस्क्रीन इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. त्याचबरोबर ही कार दिसायला बॉक्सिंग असूनही कार मोनोकॉक चेसिसवर आधारित आहे.
महिंद्रा ॲटम प्रकार
इंटरनेटवर मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा ॲटम ही चार पर्यायासह बाजारात उपलब्ध होणार आहे. यामध्ये K1, K2, K3 आणि K4 मॉडेल्सचा समावेश असेल.
फीचर्स
महिंद्राच्या या आगामी कारमध्ये फोरजी कनेक्टिव्हिटी उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये इन्फोटेनमेंट पॅनलसह अनेक सुविधा उपलब्ध असतील. मिळालेल्या माहितीनुसार, या गाडीच्या K1 आणि K2 व्हेरियंट एका फुल चार्जमध्ये 80km पर्यंत फुल रेंज देऊ शकतील. तर K3 आणि K4 व्हेरियंट एका फुल चार्जमध्ये 100km पर्यंत रेंज देण्याचे शब्द आहे.
किंमत
महिंद्राच्या या आगामी महिंद्रा ॲटमची एक्स-शोरुम किंमत 3 लाख रुपये एवढी ठेवू शकते. कंपनीकडून अद्याप या मॉडेलच्या कुठल्याही किमती बद्दल पुष्टी झालेली नाही. त्याचबरोबर ऑटोमोबाईल मार्केटमधील सद्यस्थिती बघता या इलेक्ट्रिक कारला टक्कर देण्यासाठी बाजारामध्ये कोणतेही मॉडेल उपलब्ध नाही.
महत्वाच्या बातम्या
- Navneet Rana । नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट! नेमकं काय आहे प्रकरण?
- Kiran Kumar Bakale | मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलणे भोवले ; निलंबित किरण बकालेचा जामीन अर्ज फेटाळला
- Urfi Javed | फुफ्फुसांच्या आकाराचा ड्रेस परिधान केल्यावर उर्फी झाली ट्रोल
- Rohit Pawar | “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा”; भाजप नेत्यांचे कान टोचत रोहित पवारांची मागणी
- Diwali Special Offer | TVS च्या ‘या’ बाईकवर कंपनी देत आहे स्पेशल दिवाळी ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

