सांगली : गेले ५ महिने कोरोनाने राज्यात कहर माजवला आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक लोकप्राधिनिधी, समाजसेवक, मंत्री ते बॉलिवूड स्टार्स पर्यंत अनेकांना कोरोनाने विळखा घातला आहे. आता, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते व राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मुलापाठोपाठ त्यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
सुमन पाटील या तासगाव- कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आहेत. गुरुवारीच त्यांचा मुलगा रोहित पाटील व दीर सुरेश पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी सुमन पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर, काल रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तोफा सापडल्या तेथे पोहचले न्यायालय, ‘या’ ऐतिहासिक स्थळाची न्यायमूर्तींकडून पाहणी
गेल्या २ दिवसांत अनेक लोकप्राधिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक, आमदार मोनिका राजळे,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह आमदार अनिल बाबर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
‘सामना’च्या बाबतीत २० ऑगस्टला केलेले ट्विट खरे ठरले : नितेश राणे


