Share

‘पुण्यात वीकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहणार’

Published On: 

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तर शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे.

पुण्यात विकेंड लॉकडाऊन सुरू झाला आहे. आता सोमवारी सकाळी ७ पर्यंत काय निर्बंध असतील. कारण राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता वीकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहतील, अशी माहिती पुण्याचे सह. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. पुण्यात आता शनिवार आणि रविवारी फक्त मेडिकलची दुकान सुरु ठेवण्यास परवानगी आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोना आरोग्य यंत्रणा हतबल झालेली असताना, काही अतिउत्साही पुणेकरांना घराबाहेर पडण्याचा मोह आवरता येत नाहीये. वीकेंड लॉकडाऊनच्या दिवशीही संचारबंदीच्या नियमांचे उल्लघंन काहीनी केल्याचं पाहायला मिळालं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!