Share

पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक शुल्कवाढीचा निर्णय एक वर्षासाठी स्थगित

Published On: 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या शैक्षणिक वर्षांसाठी (२०२०-२१) शुल्कवाढ स्थगित करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. त्यामुळे आता लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या विद्या परिषदेने शुल्कवाढीला स्थगिती देण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेला केली होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला.

सोमवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे म्हणाले की ‘प्रस्तावित शुल्कवाढीला स्थगिती देण्याबरोबर विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयात शुल्क भरण्याबाबत कोणत्याही प्रकारे सक्ती करता येणार नसल्याचाही ठराव करण्यात आला. तसेच विद्यापीठाची अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबतची कार्यवाही सुरू ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला’.

आता निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर अंदाजपत्रकात काही बदल करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला. त्यानुसार येत्या वर्षांत विद्यापीठाचे उत्पन्न काही प्रमाणात घटण्याची शक्यता विचारात घेऊन खर्चालाही कात्री लावली जाणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षांपासून पहिली ते सहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीने शिकवली जाणार

‘सत्तेत असलेल्यांनी प्राण्यांना न्याय मिळवून देण्याची गरज’; पूजा भट्ट ‘त्या’ प्रकणावर संतापली

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कॅम्पस जम्मू-काश्मिरात?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!