🕒 1 min read
पुणे – महाराष्ट्र सध्या कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून आणि लॉकडाउनवरून राजकारण रंगल्याचं दिसतंय. केंद्र सरकारमुळे राज्यात कोरोना लसीची कमतरता असल्याचा आरोप केला जातो आहे. महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे.
केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेसा लशीचा साठा देत नसल्याचा आरोप केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला आहे. महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील केंद्र सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केल्याने हा वाद आणखी वाढणार अशी चिन्हे दिसत आहेत.
एका बाजूला केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत असताना राज्यातील अनेक लसीकरण केंद्रांवरून आज नागरिकांना लस न घेताच घरी परतावे लागले. पुण्यातही असेच चित्र पाहायला मिळाले. अनेक लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा संपल्यामुळे लस टोचण्यासाठी आलेल्या नागरिकांना माघारी परतावं लागलं.आता पुणेकर नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
धन्यवाद, @narendramodi सरकार !
केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाला असून आज जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. तर रविवारी १ लाख २५ हजार लस मिळणार आहेत. यात शहराला ४०%, ग्रामीणला ४० % आणि पिंपरी-चिंचवडला २०% टक्के लस मिळणार आहेत.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 9, 2021
दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाला असून आज जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. तर रविवारी १ लाख २५ हजार लस मिळणार आहेत. यात शहराला ४०%, ग्रामीणला ४० % आणि पिंपरी-चिंचवडला २०% टक्के लस मिळणार आहेत. यानंतर त्यांनी मोदी सरकारचे आभार देखील मानले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- राज्यात शनिवार-रविवार वीकेंड लॉकडाऊन; जाणून घ्या काय सुरु काय बंद ?
- धक्कादायक! गावातील सप्ताहातून दोन दिवसांत ५५ जणांना कोरोना
- आता कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळेल; नारायण राणेंच भाकीत
- सचिन वाझेला दिलासा, एनआयए कोठडीतून सुटका तर न्यायालयीन कोठडीत रवानगी
- माता न तू वैरिणी! जागेच्या वादातून आईकडून मुलाचा खून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
