Share

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेसच्या नेतृत्त्वातर्फे एकही ट्विट नाही, नितेश राणेंचा शिवसेनेला टोला

Published On: 

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहिली. तर सकाळपासूनच शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत होते. स्मृतीस्थळावर न जाता घरातून, कार्यालयातून बाळासाहेबांना मानवंदना देण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होत. कोरोनाचे संकट लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी स्मृतीस्थळावर जाऊ नका असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

यावरच महाविकासआघाडीतील काँग्रेस पक्षाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्याविषयी आदर नसल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे  यांनी केला आहे. काल बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन होता. मात्र, संपूर्ण दिवसभरात काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी संदेश किंवा साधे ट्विटही करण्यात आले नाही. काँग्रेस बाळासाहेब ठाकरे यांचीच दखल घेणार नसेल तर मग शिवसेनेकडे उरले तरी काय, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. मराठी माणसाचं पाऊल पुढे नेण्याचं दुसरं स्वप्नही आम्ही पूर्ण करु, असं वचन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!