Share

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ वादात, निर्मात्यांचा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सब टिव्हीवरची मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ पुन्हा एकदा नव्या वादात सापडली आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात, या मालिकेतील जेठालालचे वडील बापुजी यांच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर अक्षेप घेतला असू सब टिव्हीने याबद्दल माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

या मालिकेत प्रसारित करण्यात आलेल्या भागात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार असा पण करतो. यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये बापुजी हे पात्र मध्यस्थी करतं आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतं. यादरम्यान…बापुजींच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे.

दरम्यान, यावर मनसेने कठोर भूमिका घेत हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता असल्याचं म्हटलं आहे. तर मुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही याचीच शरम वाटत असल्याचं मनसे नेते अमेय खोपकरांनी म्हटलं आहे.

आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी या मालिकेवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी नाही, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली ‘सुविचार’ लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत! ‘कानाखाली काढलेले मराठी सुविचार’ ह्यांना बरोबर वाचता येतील’! अशा शब्दांत शालिनी ठाकरे यांनी सुनावले आहे.

हा वाद उफाळल्यानंतर मालिकेचे निर्माता असितकुमार मोदी यांनी सीरियलच्या शेवटी प्रसारित झालेला एक सीन ट्विट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई महाराष्ट्रात आहे आणि आपल्या महाराष्ट्राची राजभाषा मराठीच आहे. यात काही संदेह नाही. मी भारतीय आहे. महाराष्ट्रीय आहे आणि गुजराती देखील आहे. मी सर्व भारतीय भाषांचा सन्मान करतो, असं मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!