औरंगाबाद : ‘सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला आहे. त्याला प्रचंड त्रास होत आहे. हॉस्पिटलची बिलं परवडत नाहीत. लॅबवरही सरकारचा कंट्रोल राहिलेला नाही. खासगी रुग्णालये रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल घेत आहेत. सरकारच्या कारवाईच्या इशाऱ्याला ते भीक घालत नसल्याचं दिसत आहे. सरकारनं याची दखल घेतली पाहिजे. लोकांना खासगी रुग्णालयांनी घेतलेल्या बिलाच्या पैशाचा परतावा दिला पाहिजे,’ अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
जनमताचा अनादर करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – कॉंग्रेस
राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर आज औरंगाबादमध्ये आले होते.यावेळी त्यांनी ही मागणी केली.
करोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह करून देणारी दलालांची रॅकेट राज्यात सक्रिय आहेत. भिवंडीत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा महाभयंकर प्रकार नुकताच उघडकीस आणला आहे, असा धक्कादायक गौप्यस्फोट दरेकर यांनी केला आहे. सरकारनं याची गंभीर दखल घ्यायला हवी,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शासन कोरोना योध्यांच्या पाठीशी निधी कमी पडू दिला जाणार नाही- अमित देशमुख
राज्यात दलालांची अनेक रॅकेट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. एखाद्या रुग्णाचा रिपोर्ट कुठल्या हॉस्पिटलला पाठवायचा याचा निर्णय हे दलाल घेत आहेत. त्यांची रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णालयांशी ‘डील’ झालेली असते. मात्र, हे महाभयंकर प्रकार सरकारला माहीतही नाहीत,’ असं दरेकर म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

