मुंबई : मराठवाड्यातील अनेक तालुक्यात जलजीवन मिशन अभियान आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत येणाऱ्या योजनांची आढावा बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीमध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, चाकुर, उदगीर, जळकोट आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत तर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, खुलताबाद तालुक्यातील योजनेचा आढावा घेण्यात आला. राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैकीत सर्व नवीन योजनेसाठी ऑक्टोंबर अखेरपर्यंत अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
यात प्रामुख्याने अहमदपूर तालुक्यात येणारी १० गावे आणि जळकोट तालुक्यात येणारी ८ गावे यांसाठी दोन वेगळ्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कराव्यात. अहमदपूर तालुक्यात १८ गावांसाठी नव्याने प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजुरीबाबतची आढावा घेण्यात आला. नवीन योजना आणि रेट्रोफिटींग योजनासंदर्भात अंदाज पत्रक तयार करीत असताना, या योजना लवकरात लवकर कार्यान्वित कशा होतील याबाबत नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मंत्र्यांनी दिले.
वसमत येथील नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळण्यासाठी नवीन योजना सुरू करण्यात येत असून या योजनेचे अंदाजपत्रक येत्या महिन्यातभरात कार्यान्वित होतील याचे नियोजन करावे तसेच या ठिकाणी नवीन ४ योजना सुरू करण्याचे प्रस्तावित असून याबाबतचे नियोजन तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत गंगापूर शहर भूमिगत गटार योजना प्रगतीपथावर आहे. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी पाईप जोडणीसह चेंबर बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. एसटीपीच्या कामास स्थानिक नागरिक विरोध करत असल्याने हे काम सुरळीत होण्यासाठी समन्वयाने जागा शोधून काढावेत तातडीने प्रकल्प पूर्ण करावेत, असे निर्देशही या वेळी देण्यात आले.
गंगापुर तालुक्याचा संपूर्ण वॉटर ग्रिडचा प्रस्ताव एपीएमसी एजन्सीकडून तयार करून तो जल जीवन मिशन योजनेअंतर्गत तयार करणे व मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. तसेच उदगीर पाणीपुरवठा योजना ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत चाचणी स्वरूपात चालू करावी. मलनिस्सारण योजनेस आवश्यक जागा मुख्याधिकारी उदगीर यांनी तातडीने उपलब्ध करून घ्यावी. जळकोट नगरपालिकेसाठी पाणीपुरवठा योजनेची आखणी मुख्य अभियंता यांनी पाहणी करून कार्यवाही करावी असे निर्देश बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंद्रा पोर्टवरील ३००० किलो ड्रग्ज प्रकरणात अदानी समूहाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले…
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; सातवा वेतन आयोग लागू
- शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू केंद्र सरकार पुसणार आहे का? आ. धीरज देशमुखांचा सवाल
- ‘या प्रस्थापितांच्या सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही हे पुन्हा सिद्ध झाले’
- सलमान खान सोबत काम करतांना जॅकी उर्फ जग्गुदादाला असा आला अनुभव..


