मुंबई : काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे कट्टर समर्थक प्रशांत पवार यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी मोठा भाऊ असल्याचं विधान केलं होत मात्र या विधानावर कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री नितीन राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लहान आणि मोठ्या भावाचा प्रश्नच उद्भवत नाही. किमान समान कार्यक्रमानुसार महाआघाडी सरकारचे काम सुरळीत सुरू असल्याचा दावा करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांचे वक्तव्य खोडून काढले होते.
मात्र तरीदेखील प्रफुल्ल पटेल आपल्या विधानावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. ‘मी नागपूरला जे बोललो त्यावर ठाम आहे. नागपूरच्या विधानसभेच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो. दुर्दैवाने काँग्रेसनी आम्हाला आधी होकार दिला आणि शेवटच्या दिवसापर्यंत टाळले’. म्हणून मी म्हणालो की, आता तर आमचे सदस्य जास्त आहेत. त्यामुळे आता तुम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत राहू शकत नाही. अस प्रफुल्ल पटेल यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
दर्म्य्यान, विदर्भात तुम्ही असाल पण भविष्यात आम्ही ही परिस्थिती बदलू शकतो. माझ्या या विधानामुळे नाराजी वगैरे काही होणार नाही. तीन पक्षांची एक समन्वय समिती आहे. आतापर्यंत कोणताही मोठा वाद निर्माण झाला नाही. अस देखील प्रफुल्ल पटेल न्हाणले आहेत.
साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा, विघ्नहर्ता बना;मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन
भारताचा चीनला दणका ; मोदी सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
रॅपिड अँटिजेन चाचणीतील बोगसपणा जनतेसमोर मांडणार- सुजय विखे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

