अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : शिर्डी मतदारसंघातील जनतेसाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून सवलतीच्या दरात आरटी-पीसीआर कोरोना चाचणी सेवा उपलब्ध झाली. कोरोनाच्या टेस्ट विषयी खा.डॉ. सुजय विखे यांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केले. रॅपिड अँटिजेन चाचणीची अजिबात खात्री नाही. हा बोगसपणा आपण डॉक्टर या नात्याने जनतेसमोर मांडणार असल्याचेही खा.विखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या संदर्भात बोलताना खा.विखे म्हणाले की, आरटी-पीसीआर टेस्ट महत्त्वाची असताना शासनाकडून जलद निदानासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात नगर शहर तसेच ग्रामीण भागात प्रशासनाकडून रॅपिड अँटीजेन टेस्टची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र या रॅपिड अँटीजेन टेस्टच्या विश्वासार्हतेवर खा.डॉ.सुजय विखे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नगर येथील डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटल व शिर्डी नगरपंचायतीतर्फे सुरु केलेल्या कोरोना चाचणी नमुना संकलन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खा.विखे बोलत होते. नगर जिल्ह्यात आरटी-पीसीआर टेस्टचीच संख्या वाढवणे गरजेचे असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेवून रॅपिड अँटीजेन टेस्टचा बोगसपणा मी डॉक्टर या नात्याने सर्वांसमोर पुराव्यानिशी मांडणार असल्याचे खा.विखे यांनी पत्रकारांना सांगितले.
हे गणराया… जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल कर – शरद पवार
दत्तू भोकनळ यांना अर्जुन पुरस्कार हा अहमदनगर जिल्ह्याचा सन्मान- थोरात
कोरोनाकडे संकट म्हणून नव्हे संधी म्हणून बघा -हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

