Share

कॉंग्रेसला मोठा धक्का,आमदारकीचा राजीनामा देत ‘या’ बाहुबली नेत्याने केला भाजपात प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

जयपूर: मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगामुळे कॉंग्रेसची चिंता वाढली आहे. यासह राज्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आज रात्री जयपूरमध्ये कॉंग्रेसचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.

कॉंग्रेसमधील नाराज नेत्यांमुळे सरकार अस्थिर झाले असताना कॉंग्रेसकडून भाजपवर अनेक गंभीर आरोप करण्यात येत होते.राजस्थानमध्ये या घडामोडी घडत असताना तिकडे मध्य प्रदेशात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार प्रद्युम्नसिंह लोधी यांनी आज काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून, पक्ष सदस्यत्वही सोडले आहे. लोधी हे छत्रपूर जिल्ह्यातील बडा मल्हेरा मतदारसंघाचे आमदार होते. आज त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना लोधी म्हणाले की, मी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. माझा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. बडा मल्हेरा मतदारसंघ आणि बुंदेलखंडाचा विकास केवळ भाजप करू शकतो. माझ्या भागातील विकासकामांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुणे : लॉकडाऊनच्या धास्तीने मार्केटयार्डमध्ये पहाटेपासूनच उसळली गर्दी

सध्याचे मुख्यमंत्री हे घरात बसून केवळ आदेश देण्यात मग्न आहेत- आठवले

#DilSeThankYou : रात्रंदिवस काम करणार्‍या पोलिसांचे अक्षय कुमारने मानले अनोख्या पद्धतीने आभार

प्रकृती ठणठणीत असून मी क्वारंटाइन असल्याचे वृत्त खोटे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!