मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. त्यामुळे सर्व नागरिक हे घरात बंद आहेत. घरात बसून काय करायचे असा सवाल प्रत्येकाला पडला आहे. या मिळालेल्या मोकळ्या वेळेमध्ये आपले छंद पूर्ण करा असे लोकप्रतिनिधी, सेलिब्रेटींकडून सांगण्यात येत आहे. मात्र भारतीयांनी हे सर्व करत असतानाचं एक अनोखा रेकोर्ड केला आहे. भारतीयांनी पोर्न साईटवर मोकळा वेळ घालवण्यास पसंती दिली आहे.
भारतात गेल्या तीन आठवड्यात पॉर्न बघण्याचा आकडा 95 टक्क्यांने वाढला आहे. फ्रान्स, इटली, रशिया अशा देशांमध्येही गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन आहे. या देशातही पॉर्न बघण्यात वाढ झाली आहे. फ्रान्समध्ये पॉर्न बघण्याच्या आकड्यात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर इटलीत हा आकडा 55 टक्क्यांनी वाढला आहे.
तसेच रशियात 65 टक्क्यांनी तर इंग्लंडमध्ये 50 टक्क्यांनी वाढला आहे. स्विझरलँड व दक्षिण कोरियात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. या तुलनेत भारताची वाढ ही दुप्पट असल्याचे समोर आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कोंडमच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली असल्याचे वृत्त आले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

