Share

‘ पोलीस भरतीत पूर्वीप्रमाणेच प्रथम मैदानी आणि नंतर लेखी परीक्षा घेणार ‘

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना आज (ता. १२) शिवसेनेने आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिध्द केला. यात पोलीस भरतीसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. ज्यात पोलीस भरतीत पूर्वीप्रमाणेच प्रथम मैदानी आणि नंतर लेखी परीक्षा घेणार, पोलीस आणि जवानांच्या मुलांना पोलीस भरतीत प्राधान्य देणार, असे विविध मुद्दे दिले आहे.

राज्य सरकारने १३ हजार तरुणांची मेगा पोलिस भरती घेण्यात येणार असल्याचे जाहीर करून केवळ ३ हजार जागा काढल्या आहेत. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे जागोजागी तरुणांनी एकत्र येऊन सरकार विरोधात मोर्चा काढून संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे भरतीसाठी तयार असणाऱ्या मुलांची संख्या ही रिक्त असलेल्या जागांपेक्षा अधिक असल्याने मुलांनी शासनाच्या खोट्या आश्वासनावर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, शिवसनेने प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यात पोलीस भरतीबाबत काही ठळक मुद्दे मांडले आहेत. यात राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचारी यांना जिल्हा पोलीस सेवेमध्ये बदलीची असलेली १५ वर्षाची अट बदलून पूर्वीप्रमाणे १० वर्षांपर्यंत कमी कण्यात येईल. जिल्हास्तरीय शाळांमध्ये आठवी ते दहावी मधील विद्यार्थांना पोलीस भरतीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्यात येईल. याशिवाय सर्व प्रकारचे पोलीस, राज्य सुरक्षा दल सेवेतील कर्मचारी विशेषतः महिलांचे आरोग्य, निवास व्यवस्था पेन्शन आणि प्रसुतीकाळातील सवलती याबाबत सर्वसमावेशक कल्याणकारी योजना आंमलात आणण्यात येतील, अशी विविध आश्वासने शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात प्रसिध्द केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182908437279072257?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182910797074202624?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!