टीम महाराष्ट्र देशा: औरंगाबादचे नवनिर्वाचित खा इम्तियाज जलील यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार कॉंग्रेस नगरसेवक अफसर खान यांनी केली आहे. खान यांनी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करत जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचं तक्रारीत म्हंटले आहे.
अफसर खान यांच्या तक्रारीनुसार त्यांनी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराचे काम केले आहे, याचा राग धरत एमआयएम खा. इम्तियाज जलील यांनी आपल्याला मारण्याची धमकी दिली आहे. जलील यांचे कार्यकर्ते ऑडीओच्या माध्यमातून आपल्याला कफन घालणार असल्याचे म्हणत आहेत, असा आरोप खान यांनी केला आहे.
दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या विरोधात गंभीर तक्रार करण्यात आल्याने औरंगबादमध्ये पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे.


