Share

पिशोर ग्रामपंचायत : सरपंचपदाचा तिढा कायम, हर्षवर्धन जाधव यांच्या भूमिकेकडे लक्ष

Published On: 

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामपंचायतीची निवडणूक विशेषत्वाने गाजली. येथे माजी आमदार हर्षवर्धन जाधव विरुद्ध त्यांच्या पत्नी व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या अशी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पिशोर ग्रामपंचायतीकडे लक्ष लागलेले आहे.

कोव्हिड – १९ (कोरोना) मुळे लांबलेली ग्रामपंचायत निवडणूक १५ जानेवारी रोजी झाली. याचा निकाल १८ जानेवारीला लागला. दरम्यान गावामध्ये झालेल्या पंचरंगी झालेल्या निवडणूकीत स्पष्टपणे कोणत्याही पॅनलला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे आता खुला प्रवर्ग महिला सरपंच पद मिळणार आहे. पण आता माजी आमदार हर्षवर्धन जाधव काय भूमिका घेतात यावर पिशोर ग्रामपंचायतीचे सरपंच कोण होणार हे अवलंबून आहे.

केंद्रीय मंत्री दानवेंचे मुलगी विरुद्ध जावई असा होता सामना
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना आणी त्यांचे जावाई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्यवर्धन जाधव यांचे पॅनल असा सामना येथे रंगला होता. पिशोर येथील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये पाच वेगवेगळे पॅनल निवडणूक लढले. परंतु एकालाही बहुमत मिळवण्यात यश आले नाही. या मध्ये माजी सरपंच पुंडलीक डहाके यांचे शिवशाही ग्रामविकास पॅनलचे सर्वात जास्त ७ उमेदवार विजयी झाले, तर हर्षवर्धन जाधव यांचे कै. रायभानजी जाधव ग्रामविकास पॅनलचे ४, संजना जाधव समर्थक ग्रामविकास पॅनलचे २, राजेंद्र मोकासे, माजी उपसरपंच नारायण जाधव यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनलचे ३, तर १ अपक्ष निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी ९ सदस्यांची गरज आहे. परंतु कोणी एकटे बहुमतापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे कोण सरपंच होणार? बहूमताच्या आकडे कसे जुळवतात यावर सर्व गणित अबलंबून आहे हे मात्र नक्की.

दोन पॅनलचे उमेदवार सहलीवर
माजी सरपंच पुंडलीक डहाके आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलचे उमेदवार सहलीवर गेले आहेत. दरम्यान सरपंच पदाचे आरक्षण घोषीत होण्याअगोदर हे सहलीला गेल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. पुंडलीक डहाके यांच्या सून सरपंच पदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. आता या वर आकड्यांची जुळवाजुळव कशी होते ? आणी कोणत्या पॅनलचा सरपंच पद मिळते का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!