Share

औरंगाबाद-जालना महामार्गावर पेट्रोलिंग, मदत केंद्र आणि सीसीटीव्ही बसवणार

Published On: 

जालना : औरंगाबाद-जालना शहराला जोडणाऱ्या औरंगाबाद-जालना महामार्गावर दिवस-रात्र वर्दळ सुरू असते. या महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून छोटे-मोठे अपघात नेहमी घडतात. या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. या रस्त्यावर मदत केंद्रे, सीसीटीव्ही नसल्याने अपघातस्थळी पोहोचण्यास पोलिस व मदत यंत्रणांना उशीर लागतो.

या संदर्भात युवा सेना राज्यविस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी बुधवारी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. औरंगाबाद-जालना महामार्गावरील समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच येथे मदत यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्याची आग्रही मागणी केली. खोतकर यांनी सांगितले की, महामार्ग दुरुस्तीबाबत आयआरबी कंपनीला आदेश मिळूनही सुरुवात करण्यात आली नाही. महामार्ग दुरुस्तीसह सीसीटीव्ही व मदत केंद्रे कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी अभिमन्यू खोतकर यांनी केली.

जालना-औरंगाबाद महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे असून गत आठवड्यात झालेल्या अपघातात तरुणांचा जीव गेला होता. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून या मार्गाची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. गृह विभागाकडून पेट्रोलिंग होत नाही, शिवाय या महामार्गावर मदत केंद्रे व सीसीटीव्ही कॅमेरे ही नाहीत. परिणामी वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. असे अभिमन्यू खोतकर यांनी सांगितले. त्यांच्या या मागण्यांची दखल घेऊन रस्ते विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांना रस्ते दुरुस्ती, मदत केंद्र उभारणीसह गस्त वाढवण्याचे आदेश दिले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!