Share

जागतिक कॅन्सरदिनी जाणून घ्या एलआयसीची कॅन्सर कव्हर पॉलिसी !

Published On: 

नवी दिल्ली : आजच्या धावपळीच्या जगात आजारांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कॅन्सर सारखे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. १९९३ पासून कॅन्सर दिवस साजरा केला जात आहे. लोकांना कॅन्सर या आजाराची माहिती देणे त्यांच्यात जनजागृती करणे हा उद्देश कॅन्सर दिवस साजरा करण्यामागे आहे.

सामान्य माणसाला कॅन्सर या आजाराची लक्षणे आणि वाढता प्रसार रोखण्यासाठी काय करायला हवे याची माहिती देता यावी. कॅन्सर झालेल्या रुग्णांकडे समाजात एका दृष्टिकोनातून पाहिले जाते. कॅन्सर पिडित रुग्णांना वेगळी वागणूक देण्यात येते. लोकांच्या मनातील समज गैरसमज दूर करुन अशा रुग्णांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलता यावा यासाठी कॅन्सर दिवस जगभरात साजरा करण्यात येतो.

या पार्श्वभूमीवर कर्करोगासरख्या गंभीर आजापासून बचावासाठी एलआयसी एक कॅन्सर कव्हर प्लान देते. या पॉलिसीची विषेशता म्हणजे ही तुम्हाला कॅन्सरपासून सुरक्षा देते. एलआयसीचा कॅन्सर कव्हर प्लान रेग्युलर प्रिमिअम प्लान आहे. जास्तकरुन हेल्थ इन्श्यूरन्स देणाऱ्या कंपन्या कर्करोगासारख्या आजाराच्या उपचारावर कव्हर देतात

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमचा (LIC) कॅन्सर कव्हर प्लान हा रेग्युलक प्रिमिअम प्लान आहे. याअंतर्गत तुम्हाला विम्याचा हप्ता वार्षिक किंवा सहा महिने असा द्यावा लागते. या विम्याचा कालावधी 10 -30 वर्षांचा असेल. कॅन्सर आजार झाल्यावरच या पॉलिसीचा फायदा मिळेल. यामध्ये कुठलीही मॅच्युरिटी नाही. सोबतच यावर तुम्ही कर्ज घेऊ शकत नाही.

यामध्ये दोन पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय – लेव्हल सम इन्श्युअर्ड आहे. यामध्ये इन्श्यूरन्सच्या सुरुवातीलाच याची रक्कम निश्चित होऊन जाते. कुठल्याही परिस्थितीत यापेक्षा जास्तची रक्कम मिळणार नाही. दूसरा पर्याय – इंक्रीजिंग सम इन्श्युअर्ड आहे. यामध्ये प्रत्येक वर्षी बेसिक सम इन्श्योर्डचा 10 टक्के सम इन्श्योर्ड वाढून जाते.

ही पॉलिसी घेण्यासाठी कमीत कमी वय : 20 वर्ष तर जास्तीत जास्त वय : 65 वर्ष असावे या पॉलिसीची किमान मुदत : 10 वर्ष असून पॉलिसीची जास्तीत जास्त मुदत : 30 वर्ष आहे. तर मॅच्युरिटीच्या वेळी कमीत कमी वय : 50 वर्ष आणि जास्तीत जास्त वय : 75 वर्ष आहे. यासाठी तुम्हाला किमान प्रीमिअम : 2400 रुपये किमान बेसिक सम इन्श्योर्ड : 10 लाख रुपये तर सर्वाधिक बेसिक सम इ्नश्योर्ड: 50 लाख रुपये भरावे लागतील.

यामध्ये तुम्हाला ‘अर्ली स्टेज कॅन्सर’ पॉलिसी घेण्याचे फायदे असे कि, सम इन्श्योर्डची 25 टक्के पॉलिसी मिळेल, पुढील 3 वर्षांचं प्रीमियम माफ केलं जाईल. तुम्ही ‘अर्ली स्टेज कॅन्सर’ बेनिफिट पूर्ण पॉलिसी फक्त एकदाच घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला ‘अर्ली स्टेज कॅन्सर’ चा डायग्नोसिस होतं, तेव्हा पॉलिसीमधून काहीही मिळणार नाही. या जर कॅन्सर हा आजार मेजर स्टेजवर कळाला तर, इन्श्योरन्सची पूर्ण रकम LIC कडून दिली जाईल. जी उपचारादरम्यान महत्त्वाची ठरु शकते. जर सुरुवातीला तुम्ही कुठला क्लेम केला तर तेवढी रक्कम कापून तुम्हाला रक्कम मिळेल. त्याशिवाय कुठलाही हप्ता भरावा लागणार नाही.

क्रिटिकल इलनेस कव्हर गंभीर आजार जसे स्ट्रोक, प्रमुख अंग प्रत्यारोपण, लकवा, कार्डिअॅक अरेस्ट, मल्टीपल स्केलेरोसिस, किडनी फेल्युअर, टोटल ब्लाइन्डनेस, बहिरेपणा इत्यादी महाग आजारांसाठी कव्हर देते, ज्यामध्ये काही प्रकारच्या जीवघेण्या कॅन्सरचाही समावेश आहे. तर, एक रेग्युलर कॅन्सर इन्श्योरन्स प्लान पॉलिसीधारकद्वारे कव्हर करण्यात आलेली गंभीर आजाराची माहिती मिळताच पूर्ण रक्कम देते.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!