मेरठ : देशात कोरोनाचा कहर काही थांबायचं नाव घेत नाहीये. दरदिवशी मृत्यूचा आकडा नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहे. या व्हायरसने आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 348,421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4205 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,55,338 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एका दिवसात झालेल्या मृत्यूंच्या नोंदींपैकी ही सर्वाधिक नोंद आहे. यापूर्वी 7 मे रोजी 4187 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.
महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असताना अनेक राज्यांमध्ये मात्र कोरोनाचा कहर सुरू आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठमधील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच येथील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडला आहे. मेरठमधील करोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या १३ हजार ९४१ वर पोहचली आहे. त्यामुळेच येथील सर्वात मोठं सरकारी करोना केंद्र असणाऱ्या लाला लजपतराय मेडिकल कॉलमध्ये रुग्णांची गर्दी झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की रुग्ण स्वत:च्या फोल्ड होणाऱ्या खाटा घेऊन येथे दाखल होत आहेत. या केंद्रामधील पंखे काम करत नाहीयत, छताला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे आणि रुग्णांच्या खाटा अगदी शौचालयाच्या दारापर्यंत असल्याचं चित्र दिसत आहे.
मेरठमधील या कोवीड सेंटरमध्ये सरकारी बेड्सच्या मधल्या जागेमध्ये लोकांनी स्वत: आणलेल्या खाटा ठेवलेल्या आहेत. या केंद्रात करोना नियमांचं पालन होतानाही दिसत नाही. रुग्णांच्या बाजूलाच त्यांचे नातेवाईक बसून असतात. रुग्णांची देखभाल करण्यासाठी कर्मचारी संख्या पुरेशी नसल्याने नातेवाईकांना परवानगी देण्यात आल्याचं समजतं. या ठिकाणी मोकळी हवाही नाहीय.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाला वेळीच रोखता आलं असतं, पण…; आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी ओढले ताशेरे
- अहिल्यादेवी होळकरांची तुलना ममता बॅनर्जींशी करणाऱ्या संजय राऊतांनी जनतेची माफी मागावी! जय मल्हार सेनेची मागणी
- पवित्र रमजानचा सण साध्या पध्दतीने साजरा करा! अब्दुल सत्तार यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन
- मुंबई महापालिकेने काढले लसीसाठी ग्लोबल टेंडर, १ कोटी डोसची केली मागणी
- SRPF जवानांच्या बदलीसाठी १५ वर्षांची अट रद्द, आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नांना यश !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

