Share

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभा गुंडाळली

Published On: 

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रविवारी घेतलेल्या आमसभेस बहुतांशी ज्येष्ठ संचालकांसह विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांनीही दांडी मारली. मोजक्याच सभासदांसह संचालकांच्या हजेरीत पाऊणतासाच्या सभेत वादग्रस्त विषयांवरच प्रश्नोत्तरे सुरू झाल्यानंतर संचालक मंडळाने सभा आटोपती घेतली.

जिल्हा बँकेच्या शेतकी भवनात रविवारी दुपारी एक वाजता जिल्हा बँकेव्दारे १०३ वी आमसभा आयोजित केली होती. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेत निश्चितच वादग्रस्त विषयांवर वादळी चर्चा होईल, असे अपेक्षित होते. पाऊण तासातच गुंडाळल्या गेलेल्या या सभेत ज्येष्ठ संचालकांसह विविध कार्यकारी सोसायटीच्या बहुतांशी सदस्यांनी दांडी मारली. त्यामुळे वादग्रस्त विषय ऐरणीवर आले नाहीत. नंदू डाखोरे यांनी पूर्णेतील २३ पैकी एकाच धान्य अधिकोष या संस्थेस १२ लाख रुपयांचे कर्ज वितरित केल्याबद्दल आक्षेप नोंदवला. या संस्थेवरच बँकेने दाखवलेल्या खप्पा मर्जीबद्दल आश्चर्य व्यक्त करीत त्या संस्थेने सर्वसामान्य शेतकऱ्यांना किती कर्ज वितरित केले, असा सवाल केला. त्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष पंडीतराव चोखट यांच्यासह बँक प्रशासन चक्रावून गेले. या प्रश्नावरून डाखोरे यांनी सारंगपूर येथील संस्थेअंतर्गत वादग्रस्त विषयांवर प्रश्न उपस्थित केले. तेव्हा आमसभेत वातावरण तापने सुरू झाले.

यावेळी डाखोरे यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. तेव्हा ज्येष्ठ संचालक अॅड. स्वराजसिंह परिहार यांनी हस्तक्षेप करीत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. आजच्या सभेसमोर प्रत्येक संस्थेअंतर्गत कर्ज वितरणासह अन्य आकडेवारीचा गोषवारा मांडणे शक्य नाही, असे बँक प्रशासनाव्दारे निदर्शनास आणून दिल्या गेले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!