टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. त्यामुळे सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहेत. पांडुरंगाची नगरी पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भारत भालके विरुध्द भाजपचे सुधाकरपंत परिचारक असा सामना होत आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होत आहे.
पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुधाकरपंत परिचारक यांना भाजपने उमेदवारी दिली होती. भाजप प्रवेशासाठी मुंबईच्या वाऱ्याकरून थकलेल्या भारत भालके यांनी शेवटी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली. भालके यांच्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सभा घेतल्या. परिचारक यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचे पाठबळ मिळाले. विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील परिचारक यांच्यासाठी प्रचार केला आहे. २००९ साली भालके हे मोहिते पाटील यांच्यासाठी जायन्ट किलर ठरले होते.
भालके हे सलग दोनवेळा येथून आमदार राहिलेले आहेत. गेल्यावेळी भाजप आणि शिवसेना वेगळी लढल्याचा फायदा भालके यांना मिळाला आणि दुसरा विजय त्यांनी संपादन केला होता. मात्र, यंदा सुधाकरपंत परिचारक यांचे तगडे आव्हान त्यांच्यापुढे होते. मुख्यमंत्री समर्थक आणि मंगळवेढा भागात प्रभाव असणारे समाधान आवताडे यांची बंडखोरी कोणाला मारक ठरणार हे पाहन महत्वाच ठरणार आहे.
विधानसभा 2014 निवडणुकीतील मतांची आकडेवारी
भारत भालके (काँग्रेस ) – 91,863
प्रशांत परिचारक (स्वाभिमानी शेतकरी संघटना) – 82,950
समाधान आवताडे (शिवसेना) – 40,910
चंद्रकांत बागल (राष्ट्रवादी) – 3075
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1186946533003939845?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1186946500707774464?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

