अयोध्या : करोडो हिंदूंसह भारतीयांचे अनेक शतकांचे असलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. मागील वर्षाच्या अखेर राम जन्मभूमीबाबत निकाल लागल्या नंतर ५ ऑगस्टला राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून बघत या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला.
राम जन्मभूमीत आता दिमाखात उभ्या राहणाऱ्या राम मंदिराच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असून हे मंदिर खास पद्धतीने बांधले जाणार आहे. भूकंप, वादळ वा अन्य कोणत्याही संकटांवर मात करून हे मंदिर सुस्थित उभे राहील अशा पद्धतीने याचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी आता शास्त्रीय पद्धतीचा अभ्यास देखील सुरु करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांची लवकरच सोडवणूक – समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे
श्री रामजन्मभूमि मन्दिर का निर्माण भारत की प्राचीन निर्माण पद्धति से किया जा रहा है ताकि वह सहस्त्रों वर्षों तक न केवल खड़ा रहे, अपितु भूकम्प, झंझावात अथवा अन्य किसी प्रकार की आपदा में भी उसे किसी प्रकार की क्षति न हो। मन्दिर के निर्माण में लोहे का प्रयोग नही किया जाएगा।
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) August 20, 2020
राम मंदिर निर्माण ट्रस्टने या मंदिर निर्माणासंबंधी ट्विट करत माहिती दिली आहे. “श्री रामजन्मभुमी मंदिराचे निर्माण हे भारताच्या प्राचीन निर्माण पद्धतीने केले जात आहे. ज्यामुळे हे मंदिर फक्त हजारो वर्ष फक्त उभेच राहणार नाही तर भूकंप, वादळ यांसारख्या संकटांमुळे कोणतेही नुकसान होणार नाही. मंदिराच्या निर्णमानासाठी लोखंडाचा उपयोग केला जाणार नाही.”
‘अशा’ आरोपींना जामीन देऊ नका-चित्रा वाघ
इन तांबे की पत्तियों पर दानकर्ता अपने परिवार, क्षेत्र अथवा मंदिरों का नाम गुदवा सकते हैं। इस प्रकार से ये तांबे की पत्तियां न केवल देश की एकात्मता का अभूतपूर्व उदाहरण बनेंगी, अपितु मन्दिर निर्माण में सम्पूर्ण राष्ट्र के योगदान का प्रमाण भी देंगी।
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) August 20, 2020
“श्री राम जन्मभुमी मंदिराच्या निर्माण कार्यास सुरुवात झाली आहे. CBRI रुडकी आणि आयआयटी (IIT) मद्राससोबतच L&T च्या अभियंत्यांनी मातीच्या परिक्षणाच्या काम सुरु केले आहे. मंदिराच्या निर्माणास जवळजवळ ३६-४० महिन्यांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे. मंदिराच्या उभारणीत वापरल्या जाणाऱ्या दगडांना जोडण्यासाठी तांब्याचा उपयोग केला जाणार आहे. १८ इंच उंच, ३ मिमी खोली आणि ३० मिमी जाडी असलेल्या १० हजार ताब्याच्या चकत्यांची आवश्यकता लागणार आहे. यासाठी तांब्याच्या चकत्यांचे दान करण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.”
के.के.रेंजप्रश्नी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही – प्राजक्त तनपुरे

