टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्ष लागला आहे. तर दुसरीकडे शिवसेना – भाजप युतीमध्ये मुख्यमंत्री कोणाचा यावरून रस्सीखेच सुरु आहे. ५३ व्या वर्धापन दिनी शिवसेनेने अप्रत्यक्ष रित्या मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. तर भाजप नेत्यांकडून देवेंद्र फडणवीसचं पुढचे मुख्यमंत्री असणार असे सांगितल जात आहे.
भाजपा आमदार राम कदम यांनी देखील मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक सर्व स्तरातून होत आहे. सर्वांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री बनतील. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे इतकचं काय तर विरोधी पक्षालाही वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं असं सांगत शिवसेनेला तसेच विरोधकांना टोला लगावला आहे.
Ram Kadam, BJP on reports that Shiv Sena is aiming to have own CM: Devendra Fadnavis is appreciated by all and he will be the CM again with everyone's support. Shiv Sena is our ally, leaders of opposition are of the opinion that Devendra Fadnavis should be the CM. pic.twitter.com/EkHNNUvHnI
— ANI (@ANI) June 20, 2019
दरम्यान लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील भाजप युतीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास सेना-भाजपला वाटत आहे. त्यामुळे सत्तातर येणरचं आहे. पण मुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार यावर भाजप-सेनेमध्ये मत भेद असल्याचं दिसत आहे. तसेच सेना – भाजपच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री पद आमच्याकडेचं येणार असा दावा केला जाता आहे.


