Share

एक मराठा लाख मराठा ! तानाजीचा झटकेबाज ट्रेलर रिलीज

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित तान्हाजी द अनसंग वॉरिअर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ओम राऊत यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ज्या मराठमोळ्या रांगड्या मावळ्याचे वर्णन ‘गड आला, पण सिंह गेला’ असे केले जाते, त्या नरवीर तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाचा इतिहास ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’मधून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

त्यापूर्वी ‘तानाजी’ चित्रपटाचे आतापार्यंत रिलीज झालेले पोस्टर, प्रोमोच भारावून टाकणारे आहेत,तर त्याचा ट्रेलरपाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. आज (ता.19) या चित्रपटाचा हा ट्रेलर अखेर रिलीज झाला. या ट्रेलरने अगदी काही तासातच लोकांना वेड लावले आहे. ट्विटरवर #TanhajiTrailer हा हॅशटॅग लगेच ट्रेंड झाला आहे.

अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री काजोल सावित्री मालुसरेंच्या भूमिका आणि सैफ अली खान उदयभानची भूमिका सकारात आहे. तानाजी मालुसरेंची ही शौर्यगाथा 3डी मध्ये बघायला मिळणार आहे.

काजोल आणि अजय देवगण यांची जोडी नेहमी हिट ठरली आहे. ते मग सिनेमांमध्ये असो किंवा खऱ्या आयुष्यात. तसेच या सिनेमाच्या निमित्ताने 12 वर्षांनंतर अजय देवगण आणि सैफ अली खान पुन्हा एकदा एका सिनेमात दिसणार आहेत. अजय देवगणने ‘तानाजी : द अनसंग वॉरीअर’ या सिनेमाचं पोस्टर नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी शेअर केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1196723833144610817?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1196726495281958913?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!