(Ramesh Kere) मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह करून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रमेश केरे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मराठा मोर्चावेळी राजकीय नेत्यांकडून पैसे घेतले असल्याचा आरोप करण्यात आला होता. सोशल मीडियावरून होत असलेल्या गंभीर आरोपांनंतर रमेश केरे पाटील स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आता आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
आत्महत्येच्या घटनेनंतर रमेश केरे पाटील यांच्या पत्नी आशाताई केरे (Asha Kere) यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात पोहोचून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. ज्यांनी-ज्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आशाताई केरे यांनी केली होती. दरम्यान विवेकानंद बाबर, अनिरुद्ध शेलार, योगेश केदार, संदीप पोळ, बाळासाहेब सराटे, विशाल पवार, नितीन कदम, प्रदीप कणसे यांच्यासह काही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश केरे पाटील यांनी विष प्राशन करण्याआधी आपल्यावर होत असलेल्या विविध आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले होते. “मागील २० वर्षांपासून मी मराठा समाजातील विविध प्रश्नांवर लढा देत आहेत. मी कधीही समाजाला विकण्याचं काम केलेलं नाही. चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर माझ्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांनी गंभीर आरोप केले. मात्र मी कधीही कोणाकडून एक रुपयाही घेतलेला नाही,” असं रमेश केरे यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
नेमकं घडलं काय?
मुंबईतील चर्चगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे-पाटील यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील जे-जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून एका ऑडिओ क्लिपमुळे मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर रमेश केरे यांनी फेसबुकवर लाईव्ह करून उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यावर चुकीचे आरोप झाले. त्यामुळे माझी नाहक बदनामी केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याजवळच्या माणसांनी मला त्रास दिला असा आरोप करत केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
मी त्यांच्या नावाला विरोध केला होता. त्यामुळे जाणीवपूर्वक मला बदनाम केले जात आहे. मी कधी असं काही केलं नाही, मी समाजासाठीच काम केलं आहे, समाजाला न्याय मिळावा यासाठी केलं आहे. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे, असं म्हणत रमेश केरे यांनी औषध प्राशन केलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | अजित पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- Bhaskar Jadhav | घरावर झालेल्या हल्ल्यानंतर भास्कर जाधवांचे फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले…
- Vinayak Raut | “यापुढे तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिलं जाईल”; भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्यानंतर विनायक राऊत आक्रमक!
- Bhaskar Jadhav | उद्धव ठाकरेंनी शिवसेना बाळासाहेबांपेक्षा दोन पावलं पुढे नेली – भास्कर जाधव
- Mallikarjun Kharge । काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवड ; शशी थरूर यांचा पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

