Share

Bhaskar Jadhav | घरावर झालेल्या हल्ल्यानंतर भास्कर जाधवांचे फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Bhaskar Jadhav | मुंबई : सत्तांतरानंतर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर अतिशय कठोर शब्दात टीका करत आहेत. अलिकडेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून त्यांच्या विरोधात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. अशातच भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली. जाधवांवर झालेल्या या हल्ल्यांनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर आरोप केले आहेत.

”काल रात्री अचानक माझ्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि माझ्या घरावर हल्ला झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी अपेक्षा नसल्याचं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. “ते पोलीस खात्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री असं काही करतील असं मला वाटत नाही. गृहमंत्र्यांकडून हे आदेश आले असावे आणि माझं सुरक्षा कवच काढलं असावं”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली. नवी मुंबईत आयोजित ठाकरे गटाच्या तडीपार मोर्चात सहभागी झाल्यानंतर भास्कर जाधव माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हि प्रतिक्रिया दिली.

पुढे ते म्हणाले, “गेल्या ४० वर्षांपासून मी राजकारणात आहे. मी कधीही सुरक्षा मागितली नाही. मी माझा शेतीचा व्यवसाय करून मी राजकारण करतो. त्यामुळे मला सुरक्षेची गरज नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालिन गृहमंत्र्यांनी मला सुरक्षा घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार माझ्या मुंबईतील आणि गावातील घरी सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, काल रात्री अचानक माझ्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि घरावर हल्ला झाल्याचं त्यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

चिपळूण येथील भास्कर जाधव यांच्यावर आज्ञातांनी मध्यरात्री भास्कर जाधव यांच्या घरावर दगड फेक करण्यात आली. यावेळी स्टंम्प आणि बाटल्या फेकून आज्ञात पसार झाले आहेत. जाधव यांच्या घर आणि वाहनांवर दगड फेकण्यात आले आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही दगडफेक कुणी केली हे अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांच्या घरी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी त्यांच्या घराभोवती बंदोबस्त वाढवला आहे. तसेच घराशेजारील सीसीटीव्ही कॅमरे तपासले जात आहेत. तसेच शेजाऱ्यांचीही चौकशी करून काही माहिती मिळते का याचा पोलीस शोध घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!