टीम महाराष्ट्र देशा : राज्यात नुकत्याच झालेल्या पोलीस दलातील बदल्यानंतर आता, मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मंत्रालयातील बहुसंख्य अधिकारी वर्षानुवर्षे एकाच पडला चिटकून आहेत. या सर्वचं अधिकाऱ्यांना जोर का झटका देत त्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्यमंत्र्यांनी काढले आहेत. या आदेशांतर्गत सुमारे ७० अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.
या अधिकाऱ्यांमध्ये ४४ कक्ष अधिकारी, ११ सचिव आणि १४ उपसचिव व सह्सचिवांचा समावेश आहे. हे अधिकारी सात ते आठ वर्षापासून एकाच ठिकाणी असल्याने निर्ढावले होते. त्याचबरोबर त्यांच्या उशिरा येण्याच्या तक्रारीतही वाढ झाली होती, म्हणून त्यांना सरळ करण्याच्या हेतूने या बदल्या झाल्याचं बोललं जात आहे.


