अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. त्यातच मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी अनेकदा पुढे येत असते. मात्र त्याला ओबीसी समाजातील अनेक संघटनांचा विरोध आहे.
तसेच याच पार्श्वभूमीवर ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी सर्व संघटनांनी संघटीतपणे एकमुखी लढा उभारण्याची निर्धार करण्यात आला असून त्यासाठी नगरमध्ये २३ नोव्हेंबरला ओबीसी हक्क परिषदेच्या वतीने महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करण्याची मागणी काही जण करीत आहेत. मात्र मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यास अनेक संघटनांनी विरोध केला आहे.
त्यासाठी लढा उभारण्याची तयारीही या संघटनांनी सुरू केली असून त्याच अनुषंगाने नगरमध्ये महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. समता परिषद, जय भगवान महासंघ, नाभिक महामंडळ, तेली समाज संघटना, धनगर महासंघ, मल्हार सेना, ओबीसी परिषद, सावता परिषद, कुंभार समाज, सोनार समाज, गुरव समाज, चांभार समाज, फुले ब्रिगेड, सावता युवक आदी संघटनांच्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक नगरमध्ये झाली. त्या बैठकीत महामेळाव्याचे नियोजन करण्यात आले.
या बैठकीनंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे आता २३ नोव्हेंबरला होणाऱ्या महामेळाव्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार, याकडे ओबीसी समाजासह इतर समाजाचेही लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोटात येऊ लागला पुन्हा भितीचा गोळा; ‘या’ जिल्ह्यात कोरोना पुन्हा वाढतोय!
- शिर्डी नगरपंचायतवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी कटिबद्ध व्हा- राधाकृष्ण विखेंचे कार्यकर्त्यांना आदेश!
- ‘फ्युज उडालेल्या सरकारकडून गोरगरीब वीज ग्राहकांना काहीच मिळणार नाही’
- ‘रेमेडिसविर’ औषध कोरोनावर गुणकारी नाही ; WHO ने केले औषधांच्या यादीतून बाद
- कृषि विद्यापीठाच्या संशोधनानंतर ‘ड्रॅगन फ्रुट’च्या लागवड क्षेत्रात वाढ !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

