मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. यात काही दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे तर काहींनी विजय मिळवला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून सुरूवातीच्या कलांनुसार युती मुंबईत पुढे असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी मताधिक्यांची घोडदौड कायम राखली आहे. 19व्या फेरीमध्ये 25,203 मताधिक्क्यांची निर्णायक आघाडी घेतल्यानंतर त्यांचा विजय जवळपास निश्चित असून, फक्त अधिकृत घोषणा होण्याचीच बाकी आहे.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीत फटाके फोडून जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. नारायण राणेंबरोबर 25 वर्षं राहिल्यानंतर सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. तसेच नितेश राणेंच्या एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीलाही सतीश सावंतांच्या उमेदवारीमुळे रंगत आली होती.
दरम्यान,वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला धक्का बसला आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा काँग्रेस उमेदवार झिशान सिद्दीकी यांनी पराभव केला आहे. झिशान हे ४,२८५ मतांनी विजयी झाले आहेत. झिशान काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना या मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली होती.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1187290814570827776?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1187290218698702850?s=20

