टीम महाराष्ट देशा : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठी सोपी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात अवघड झाल्याने निलंगा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची झाली. त्यामुळे या मतदारसंघातून कोण बाजीगर ठरणार याबाबत औत्सुक्य लागून राहिले आहे.
निलंगा विधानसभा मतदारसंघ हा निलंगेकर घराण्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. १९६२ पासून आजतागायत या मतदार संघातून १९९५ चा एकवेळचा अपवाद वगळता सातत्याने निलंगेकर घराण्यातील व्यक्तीच निवडून आली आहे. माजी मुख्यमंञी डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर, दिलीपराव पाटील निलंगेकर व संभाजीराव पाटील निलंगेकर या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
त्यामुळे निलंगा विधानसभा मतदारसंघ अन् निलंगेकर घराणे असे जणू एक राजकीय समीकरण बनले आहे. या निवडणूकीत भाजपाकडून ना.संभाजीराव पाटील निलंगेकर ,काँग्रेसकडून अशोकराव पाटील निलंगेकर तर वंचित बहुजन आघाडीकडून डाँ.अरविंद भातांब्रे अशी तिरंगी लढत असली तरी खरी लढत ही निलंगेकर काका -पुतण्यांमध्येच पाहायला मिळते.विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर जिल्ह्यातील सर्वात सुरक्षित जागा संभाजीराव पाटील यांची समजली जात होती.
संभाजीराव यांच्या विरोधात काँग्रेसने अशोकराव पाटील यांना उमेदवारी दिली.संभाजीराव पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सुरुवातीला तशी एकतर्फीच वाटत होती.तब्बल ५०-६० हजार मताधिक्याच्या फरकाने ते सहज विजयी होतील असे राजकीय जाणकारांकडून बोलले जात होते. दरम्यान मतदानाच्या अगोदरच्या ४-५ दिवसात या मतदारसंघातील चिञ माञ बदलल्याची जोरदार चर्चा ऐकावयास येत आहे.
शिरुर अनंतपाळ शहरासह देवणी व निलंगा तालुक्यात वंचित आघाडीने चांगली मते घेतल्याचे ऐकावयास येत आहे.निलंगा शहर व औरादसह काही गावात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे तर ग्रामीण भागात भाजपाने मोठी आघाडी घेतल्याचे समजते. परिणामी सुरुवातीला अतिशय सोपी असलेली हि निवडणूक शेवटच्या टप्प्यात भाजपासाठी अवघड झाली. भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचे या मतदारसंघातून १ लाखाचे मताधिक्य घेण्याचे मिशन माञ फेल होणार असे दिसत आहे. अनपेक्षितपणे बदललेल्या या राजकीय वातावरणामुळे अशोकराव पाटील चांगलेच स्पर्धेत आल्याने निलंगेकर काका-पुतण्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.
मागील २-३ महिन्यापासून गाव भेट दौ-याच्या माध्यमातून अशोकराव पाटील यांनी निवडणूकीच्या अगोदरच संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढल्याचा अशोकराव यांना चांगला फायदा झाल्याचा पाहायला मिळाला. मला ‘अशोकराव’यांना आमदार झालेलं पाहायचं आहे, अशी मतदारांना केलेली माजी मुख्यमंत्री डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची भावनिक साद,अशोकराव यांच्या बरोबरच त्यांच्या अर्धागिनी संगीताताई पाटील यांनी घेतलेले कष्ट, कन्या समृध्दी व पुतण्या पृथ्वी या भावंडाने रँली काढून प्रचारात हिरीरीने सहभाग घेतल्याने शेवटच्या टप्प्यात अशोकराव पाटील यांना सहानभूती मिळाल्याने शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने आघाडी घेतल्याचे चिञ पाहायला मिळाले. एकुणच या निवडणूकीत वंचित आघाडीचे उमेदवार डाँ.अरविंद भातांब्रे किती ? आणि कोणत्या निलंगेकरांचे मते खाणार ? यावरच या निवडणूकीच्या निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे. या निलंगेकर काका-पुतण्यांमध्ये कोण बाजीगर ठरणार,हे माञ २४ आँक्टोबर रोजी मतमोजणी दिवशीच स्पष्ट होणार आहे.
मतदानाचा टक्का घसरला
या मतदारसंघाची ३१६२९२ एवढी मतदारसंख्या असून १९६२४१(६२.१०%) एवढे मतदान झाले आहे. तर २०१४ च्या निवडणूकीत २८६०१२ एवढे मतदार होते. यापैकी १९३७२०(६७.७३%)एवढे मतदान झाले होते. मागील निवडणूकीच्या तुलनेत या निवडणूकीत ५% मतदान कमी झाल्याने हा मतदानाचा घसरलेला टक्का नेमकं कोणत्या उमेदवाराच्या पथ्यावर पडणार याची आकडेमोड करताना भाजप व काँग्रेस या पक्षाचे कार्यकर्ते दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1186961938078564352?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1186961510150496256?s=20


