Share

नेवासा तालुक्यात फटाके फोडत, पेढे वाटत मराठा आरक्षणाचे स्वागत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्याने नेवासा तालुक्यातील विविध गावात फटाके फोडत , पेढे वाटून आनंद साजरा केला तसेच कै. काकासाहेब शिंदे यांच्या प्रतिमेस अभिवादन करत सुनीता गडाख यांचे अभिनंदनाचे बोर्ड लावून या निर्णयाचे स्वागत केले .

गंगापूर तालुक्यातील कै. काकासाहेब शिंदे यांनी प्रवरा संगम येथे मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतली होती. त्यानंतर माजी आमदार शंकरराव गडाख यांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी १ लाखाची मदत दिली होती . बेळपिपळगाव, कुकाना , प्रवरा संगम , देवगाव , खरवंडी , वडाळा, घोडेगाव , उस्थळ दुमाला , शिरसगाव यासह सुमारे ३० गावात मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद फटाके फोडत, पेढे वाटून साजरा करण्यात आला.

दरम्यान मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नेवाशात माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा आंदोलन झाले होते. तसेच अहमदनगर येथील मूक मोर्चा साठी नेवासा तालुक्यातील गावागावातून अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाला तालुक्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी पाठींबा दिला होता.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!