टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांत समोर येणार आहे. यामध्ये काही लक्षवेधी लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यात कर्जत-जामखेड सह नेवासा मतदार संघाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
या मतदारसंघात भाजपचे बाळासाहेब मुरकुटे आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांच्यात अस्तित्वाची लढत होत आहे. संपूर्ण प्रचारात एकमेकांवर सडकून टीका केल्यानंतर आता नेवाशाची जनता कोणाला कौल देते याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत नेवासा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांनी 84 हजार 570 एवढी मते घेत विजय मिळवला. नेवासा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असलेले शंकरराव गडाख होते. त्यांना 79 हजार 911 मते मिळाली. आणि त्यांचा 4 हजार 659 मतांनी पराभव झाला. नेवासा विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर शिवसेना चे साहेबराव घाडगे पाटील, चौथ्या स्थानावर काँग्रेस चे दिलीप वाघचौरे आणि पाचव्या क्रमांकावर मनसे चे दिलीप मोटे होते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1187181365919223808?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1186970610066345985?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1186966914620248064?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

