Share

कंगना VS शिवसेना – ‘या’ तारखेला होणार फैसला!

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयाला मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकामाची नोटीस देत कार्यालय खाली करण्यास सांगितले होते. यानंतर, काल सकाळी तिच्या कार्यालयावर कारवाई करत जेसीबी व इतर कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने तळमजल्यावरील बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली होती.

या कारवाईनंतर कंगनाच्या वकिलांनी तात्काळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने काल तोडकामास स्थगिती दिली होती. यावर आज उच्च न्यायालयात बीएमसी व कंगनाच्या वकिलांची बाजू ऐकून घेण्यात आली असून पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत कोणतेही बांधकाम कंगनाला करता येणार नसून बीएमसीला देखील कारवाई करता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने करण्यात आल्याचे आरोप शिवसेनेसह राज्य सरकार व बीएमसीवर करण्यात आले आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलीस व व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवल्याने ही कारवाई केली जात असल्याची टीका करत कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे.

कंगनाला एक दिलासा तर एक धक्का!

आज कोर्टाने २२ सप्टेंबर पर्यंत कारवाईस स्थगिती देत कंगनाला काहीसा दिलासा जरी दिला असला तरी कंगना रणौत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरे यांचा अवमान केल्याप्रकरणी कंगनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता कंगना यावर काय प्रतिक्रिया देणार हे देखील महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या:-

अहमदनगरमध्ये कंगनाचा कुठलाच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; शिवसेनेचा आक्रमक!

ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरुन लक्ष हटवण्यासाठी कंगणाला पुढं आणलं जात आहे- खा.अमोल कोल्हे

महाराष्ट्रातील ‘ही’ योजना ठरतेय पांढरा हत्ती, आमदार पाटणी यांचा दावा 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!