टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. प्रत्येक मतदारसंघाचा निकाल आता समोर येत आहे. मावळ मतदारसंघाच्या निकालाचा पहिला कल हाती आला आहे.
यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शेळके हे आघाडीवर आहेत. तर भाजप उमेदवार बाळा भेगडे हे पोस्टल मतात पिछाडीवर पडले आहेत.
मावळात यंदा चुरशीची लढत पाहिला मिळत आहेत. सुनील शेळके आणि बाळा भेगडे हे दोन्ही मातब्बर नेते आमने सामने असल्याने मावळातील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
UPDATE
भाजप : 27
शिवसेना : 20
कॉंग्रेस : 8
राष्ट्रवादी कॉंग्रेस : 12
वंचित : 0
मनसे : 0


