Share

राष्ट्रवादीला जोरदार धक्का; ’या’ बाहुबली नेत्याने ठोकला पक्षाला राम राम

Published On: 

गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहित राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिव शंकरसिंह वाघेला यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

वाघेला हे गुजरातमध्ये एनसीपीच्या अध्यक्ष पदावर जयंत पटेल उर्फ बोस्की यांची नियुक्ती झाल्यापासून पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी या नाराजीतूनच राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत – रामदास आठवले

शंकरसिंह वाघेला यांनी जनसंघाच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. नंतरच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ज्येष्ठ नेते असलेल्या वाघेलांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत १९९६ साली स्वत:चा राष्ट्रीय जनता पार्टी हा पक्ष स्थापन केला. १९९६ ते १९९७ गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या वाघेलांनी गेल्या वर्षी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.

79 वर्षीय शंकरसिंह वाघेला हे 1970 ते 1996 अशी तब्बल भाजप 26 वर्षे भाजपमध्ये होते. तर 1998 ते 2017 ही 19 वर्षे त्यांनी काँग्रेसमध्ये घालवली. त्यांनी राजकीय कारकिर्दीत पाचव्यांदा एखाद्या पक्षाचा राजीनामा दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!