🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोनासारख्या जीवघेण्या साथीच्या रोगावर जगभरात उपचार करण्यासाठी असंख्य प्रयत्न सुरू आहेत, परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजली कोरोनावर आधारित कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं ‘कोरोनिल’ जगासमोर आणणार आहे. आचार्य बालकृष्ण हे आज दुपारी 12 वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लॉन्च करणार आहेत. बाबा रामदेवही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
पतंजली योगपीठाने दावा केला होता की, त्यांना कोविड – 19 ला रोखण्याचे औषध सापडले आहे आणि ते प्रभावीदेखील ठरले आहे. कोविड – 19 विषाणूविरोधात प्रभावी औषध आणि लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनलॉक सुरू झाल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. जर पतंजली योगपीठाचा दावा खरा ठरला तर देशातील लाखो लोकांना मोठी मदत मिळणार आहे. शिवाय अर्थव्यवस्थाही पुन्हा रुळावर येऊ शकेल.
https://twitter.com/Ach_Balkrishna/status/1275059403750703116?s=20
पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नका, कृषीमंत्र्यांचे आवाहन
दरम्यान, कोविड – 19 या विषाणूचे औषध बनविण्याचा दावा पतंजली योगपीठाचे सरचिटणीस आणि योग शिक्षक बाबा रामदेव यांचे सहयोगी आचार्य बाळकृष्ण यांनी केला आहे. आचार्य बालकृष्ण म्हणाले होते की, यावेळी कोरोना विषाणू भयावह स्थितीत आहे. कोरोना विषाणूचा शोध लागला तेव्हापासूनच पतंजली संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने त्याच्या औषधाचा शोध सुरू केला होता. ते म्हणाले की तुळस, अश्वगंधा तसेच अनेक प्रकारचे रस यांनी बनविलेले हे औषध हजारो कोरोना पॉझिटिव्ह लोकांवर वापरले गेले आहे. त्यांचा पाठपुरावा करण्यात आला असून ते सर्वजण बरे झाले आहेत.
‘ठाकरे सरकार’चा मोठा निर्णय राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

