Share

राष्ट्रवादीची विधानसभा आढावा बैठक संपन्न ; शरद पवारांनी घेतला अनेक जिल्ह्यांचा आढावा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीची आढावा आज पार पडली. या बैठकीत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यातील मतदार संघांचा आढावा घेण्यात आला.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने सर्व पक्षांच्या नेत्यांनी दुष्काळी दौरेही केले आहेत. याचदरम्यान आगामी विधानसभा निवडणूकचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत विधानसभा आढावा बैठक आयोजित केली होती. दरम्यान या बैठकीत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर आदी शहर आणि ग्रामीण भागातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते.

शरद पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी, पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!