Share

Narayan Rane । रमेश लटके असते तर आज ते शिंदे गटात असते; नारायण राणेंचा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्या राजीनाम्यावरुन चांगलंच राजकारण तापलं होतं. महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या लटके यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राजीनामा दिला होता. हा राजीनामा महापालिका मंजूर करत नसल्याने हे प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. या प्रकरणी ऋतुजा लटके यांना दिलासा मिळाला असून त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यानंतर त्यांनी निवडणूक अर्ज भरला. या सर्व घडामोडींवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

नारायण राणे यांनी आज(शुक्रवार) दक्षिण मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राणे म्हणाले कि, नितशे राणे काय म्हणाले हे मला नेमकं माहीत नाही, माझं याबाबत त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. पण मला एवढी माहिती होती की रमेश लटके असते तर आज शिंदे गटात असते. तसेच, अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय होईल, असा विश्वासही राणेंनी यावेळी व्यक्त केला. तसेच दक्षिण मुंबईत भाजपाचाच खासदार असणार आणि मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ.” असंही राणेंनी म्हटलं आहे.

नितेश राणे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांना जर लटके कुटुंबाविषयी एवढीच सहानभुती होती तर त्यांनी स्पष्ट करावं की ते रमेश लटके यांना कितीवेळा भेटले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री, आणि पक्षप्रमुख झाल्यानंतर त्यांनी रमेश लटके यांना वेळ दिला का? त्यांना किती वेळ मातोश्रीबाहेर उभे राहावे लागेल असा खोचक सवाल देखील नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. तसेच रमेश लटकेंचं काम कोणीही नाकारणार नाही. पण मातोश्रीमध्ये त्यांचा किती अपमान झाला हे त्यांनी मला अंगणेवाडीसाठी जात असताना विमानतळावर सांगितलं होतं, असंही राणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!