टीम महाराष्ट्र देशा : महाविद्यालयीन प्रवेशासाठी राज्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी ५०% कोटा हा राखीव ठेवण्यात येतो. मात्र मुंबईतील एचआर, केसी, आणि जयहिंद महाविद्यालयांमध्ये या कोट्याचा वापर घोटाळ्यासाठी होत असल्याचा आरोप, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. तर मुंडे यांनी मांडलेल्या मुद्यावर योग्य ती चौकशी करून कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही राज्याचे शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.
फडणवीस सरकारच्या कार्यकाळातले शेवटचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मोठी बाब सभागृहासमोर आणली आहे. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, मुंबईतील एचआर, जयहिंद, केसी व अशा नामांकित महाविद्यालयात अल्पसंख्यांक कोट्यातील फक्त ५ ते १० टक्के प्रवेश हे भाषिक अल्पसंख्याकातून करण्यात येतात.
तर उर्वरित ४० ते ४५ टक्के प्रवेश हे आर्थिक देवाणघेवाण करुन घेतले जातात. हे प्रवेश घेतना प्रत्येक विद्यार्थ्याकडून ४ ते ५ लाख घेतले जातात,असे ते म्हणाले. तर या प्रवेश घोटाळ्याची केस टू केस चौकशी करणार आहे. तसेच यावर्षी एकही ऑफलाईन प्रवेश होणार नाही, अशी ग्वाही शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

