नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे युध्द पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय योजनांना राबविल्या जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हात स्वच्छ ठेवणे, गर्दी टाळणे, असे आवाहन सरकारने केले आहे. तर अनेक सरकरी खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सांगण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी कडकडीत लॉक डाऊनहि करण्यात आले आहे.
दरम्यान या साऱ्या तणावाच्या परिस्थितीत स्वच्छेतेबाबतची साधगिरी बाळगण्यासाठी म्हणून हँड सॅनिटायझरच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी अनेक ठिकाणी आता रुग्णालयांनाच सॅनिटायझरचा तुटवडा जाणवू लागला. या अतिशय अडचणीच्या प्रसंगी अखेर AIIMS एम्स म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेतील काही वैद्यकीय तज्ज्ञांनी अत्यावश्यक असं सॅनिटायझर आणि प्लास्टीकचे मास्क बनवण्यास सुरुवात केली.
एम्समधील डॉ. माथूर यांनी याबाबत माहिती दिली. PPE मध्ये आय शील्ड म्हणजे (डोळे झाकण्यासाठीचं आवरण), मास्क, बूटांचं आवरण, गाऊन, ग्लव्ज, हातमोजे अशा वस्तू असतात. ज्याचा वापर कोरोनाग्रसत् रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांकडून केला जातो. पुरवण्यात आलेलं PPE ही पुरेसं नाही. अशा प्रसंगी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्हाला पर्याय शोधण्यावाचून मार्ग नव्हता. त्यासाठी एम्समध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा धोका पत्करु शकत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर लावण्यात येणाऱ्या मास्कसोबतच आम्ही WHOच्या मार्गदर्शनाअंतर्गत अल्कोहोल असणाऱ्या सॅनिटायझर्सचीही निर्मिती केली.
ज्यामुळे डॉक्टरही हा संसर्ग होण्यापासून दूर राहू शकतात’, असं. सध्याच्या घडीला जवळपास २० लीटर इतकं सॅनिटायझर बनवण्यात आलं आहे, तर शंभर मास्क तयार करण्यात आले आहेत. ज्याचा वापर कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना होणार आहे.

