Share

तब्बेत बिघडल्याने खासदार नवनीत राणा नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल

Published On: 

🕒 1 min read

नागपूर- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा-कौर यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला तात्काळ हलविण्यात आले आहे. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र, तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे.

नवनीत राणा यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जवळपास सहा दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच उपचार सुरु आहेत.

नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेत. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा धुव्वा उडवत नवनीत कौर निवडून आल्या आहेत. तर त्यांचे यजमान आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आहेत.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

धक्कादायक : भाजपा आमदारासह कुटुंबातील आणखी 6 जणांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

शाळा व महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क कमी करण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!