टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस खा. उद्यनराजे भोसले यांनी आज भल्या पहाटे तुळजाभवानीचे दर्शन घेतले आहे, यावेळी उदयनराजे यांनी राज्यातील दुष्काळ दूर करण्याचे साकडे देवीला घातले आहे.

आज सकाळी पहाटे पहाटे उदयनराजे हे तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी पोहचले होते, पहाटेची वेळी असताना देखील त्यांच्या समर्थकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी जमली होती. यावेळी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन दुष्काळ निवारणासाठी तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मनोमन प्रार्थना केल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.
https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/posts/1431956616943510
मी ‘त्याला’ किंमत देत नाही
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट आणि उदयनराजे यांच्या समर्थकांकडून त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करण्याची मागणी केली जात आहे. याबद्दल विचारलं असता मुख्यमंत्री पद आपल्यासाठी गौण असून अशा पदांना किंमत देत नाही, असं खा. उदयनराजे म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

