Share

बहुतांश दवाखाने बंद, शाळेला बनवलं कोरोना प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्र

Published On: 

निफाड : राष्ट्रवादी काँग्रेसचे निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर तसेच पिंपळगाव बसवंत येथील डॉक्टर्स आणि मेडिकल स्टोअर्सचे संचालक यांनी एकत्र येत ग्रामपंचायत पिंपळगाव बसवंत, स्व. अशोकराव बनकर नागरी पतसंस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत, भीमाशंकर ग्रामोदय संस्था व पिंपळगाव मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पिंपळगाव बसवंत यांच्या संयुक्त विद्यमाने भीमाशंकर इंग्लिश मिडीयम स्कुल येथे कोरोना प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे.

बहुतांश दवाखाने बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. या बाबीचा विचार करता सर्दी, खोकला, ताप किंवा श्वसनाच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र तपासणी केंद्र हे पिंपळगाव बसवंत येथील भीमाशंकर इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये सुरु करण्यात आले आहे.

सदर केंद्राची उभारणी करतांना सामाजिक अंतर राखणे, लहान मुलांसाठी वेगळा कक्ष तर पुरुषांसाठी व महिलांसाठी वेगळा कक्ष तसेच नोंदणी विभाग, मेडिकल, स्कॅनींग सेंटर, एक्सरे सेंटर अशा प्रकारचे विविध कक्ष निर्माण करून अतिशय चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रत्यत्न या माध्यमातून केला आहे. सदरचे केंद्र हे राज्यातील अशा प्रकारचे पहिले केंद्र आहे. अशा कठीण प्रसंगी आमदार मा. दिलीप बनकर यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन नवा आदर्श समोर ठेवलाय.

तसेच दिलीप बनकर सभापती असलेल्या शरदचंद्रजी पवार कृषि उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंतकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याबाबतचा निर्णय आज समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. तसेच अधिकचे २५ लाख रूपये बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कोरोना पासून नागरिकांचा बचाव करणे, औषधोपचार, तपासणी आदी साठी खर्च करण्यात येणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!