Share

मोदींच्या डर्टी पिक्चर मध्ये तुमची भूमिका काय ? विखे-पाटलांचा शिवसेनेवर हल्ला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्हीलन म्हणतात. मग मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात त्यांचा जो डर्टी पिक्चर सुरू आहे, त्यात शिवसेनेची भूमिका काय आहे? मोदी व्हीलन असतील तर उद्धव ठाकरेंना साइड व्हीलनच म्हणावे लागेल. असा सणसणीत टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे.

नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे त्यांच्यात आणि भाजपात झालेल्या एका डीलचा भाग आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, “नाणार नाही देणार! ”. मग नाणारच्या तहात काय घेणार? ते उद्धव ठाकरेंनी सांगून टाकावे. शिवसेना पक्षप्रमुख असेही म्हणतात की, मावळे विकले जात नाहीत. मावळे विकले जात नाहीत, हे खरे आहे. म्हणूनच तर शिवसेना आजवर टिकून आहे. पण आजचे स्वयंघोषित सेनापती मात्र विकले जातात, ही दुर्दैवाची बाब आहे.

मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे करतात. असे असेल तर अशा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात तुमचे मंत्री कायम तरी कशाला राहतात?सरकारमधून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या इशाऱ्यांची आता डबल सेन्चुरी होत आली आहे, अशी टीका सुद्धा विखे पाटलांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!